Technology

>वापरता येण्याजोगे प्रतिशब्द

>

जालावर फिरता फिरता मला काही वापरता येण्याजोगे प्रतिशब्द सुचले….आधी वापरले गेले आहेत् का मला माहिती नाहि आणि वापरता येण्याजोगे आहेत् का ते तुम्हीच् ठरवा!!!
Internet- संकेत गुंता/ वीण ……….जालावर फिरताना आपण हाताच्या चिन्हाखाली असलेल्या संकेतांवर अवलंबून असतो. गुंता या शब्दापेक्षा मला वीण हा शब्द बरा वाटतोय्…कारण् या

संकेतांची एक् सुंदर् वीण गुंफलेली असते..
blog- संकेतकट्टा
web page-संकेतपान
web address-संकेतपत्ता
browsing-संकेतस्वार होणे
website-सांकेतिका & pornographic site-बिभत्सिका

hacking- संकेतहरण……………..अपहरणासारखेच्!!!
hang- असंवेदनिक् ………….त्यानंतर् संगणकाला काहिही संवेदना नसते.
mouse-दर्शवाटाड्या ……………..दर्शक +वाटाड्या…………..दर्शाड्या????
keyboard-टंकक
touch screen- स्पर्शसंवेदनिका (touch pen? –स्पर्शलेखणी )
CPU-माहिती संचलन केंद्र
hardware-बहिर्धाने……………साधने या शब्दवरून्
software- अंतर्धाने……………..बहिर्धाने बाहेरुन् दिसतात अंतर्धानांचे अंतर्गत कार्य चालु असते….!!?#@***???
मराठिची एवढी जाणकार नसल्याने बर्‍याच् बाबतीत हा प्रयत्न हास्यास्पद झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुधारणा जरूर करा.

Comments are closed.