Agriculture Irrigation Marathi

ठिबक सिंचन पद्धतीची निवड

ठिबक संचामध्ये एका लॅटरलद्वारे किती पाण्याचा प्रवाह वाहून न्यायचा आहे, त्यानुसार लॅटरलची लांबी ठरविली जाते. जास्त लांबीच्या लॅटरल ठेवल्यास पाण्याचे वाटप समान होत नाही, तसेच लॅटरलची लांबी वाढल्यामुळे संचाचा खर्चही वाढतो. याउलट कमी लांबीच्या लॅटरल ठेवल्यास उपमुख्य नळीची लांबी वाढते, त्यामुळे झाडांची भविष्यातील (पूर्ण वाढ झाल्यानंतर) पाण्याची गरज व पंपातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा प्रवाह विचारात घेऊन उपमुख्य नळीची मांडणी करावी.त्यानुसार मोठ्या बागेस विविध भागांत विभाजन करून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र व्हॉल्वची रचना करावी.यासाठी संचास लागणारा खर्च लक्षात घेऊन पाणी देण्यासाठी सोपा असलेला पर्याय निवडावा. आंतरमशागतीत कमीत कमी अडथळा होईल अशी मांडणी करावी.
झाडाची दररोजची पाण्याची गरज माहिती असल्यास ड्रीपर्सची संख्या, त्यांचा दर ताशी प्रवाह इ. ठरविता येतो. साधारणतः पहिल्या वर्षी एका ड्रीपरने पाणी दिल्यास पाणी पुरेसे होईल. दुसऱ्या वर्षी दोन ड्रीपर्स, तर तिसऱ्या व चौथ्या वर्षी तीन ड्रीपर्सने पाणी द्यावे. झाडाचा विस्तार पाचव्या वर्षी वाढल्यास एकाच लॅ टरलवर चार ड्रीपर्स लावू नयेत. साधारणतः झाडाचे वय पाच वर्षे झाल्यास एका ओळीसाठी दोन लॅटरल लावून ड्रीपर्सची संख्या वाढवावी. ठिबक सिंचन संच बसविताना संपूर्ण वाढलेल्या झाडांची पाण्याची गरज विचारात घेऊनच लॅटरल व ड्रीपर्सची संख्या, उपमुख्य नळीची आखणी इत्यादी करणे आवश्‍यक आहे.

ठिबक सिंचन पद्धतीची निवड :
अगदी सुरवातीच्या काळात फळझाडांना एका लॅटरलवर अनेक मायक्रोट्यूब (सूक्ष्म नलिका) लावून झाडाची पाण्याची गरज भागविली जात असे. कमी खर्चासाठी व सहज करता येण्यासारख्या या पद्धतीत मायक्रोट्यूबची लांबी कमी – जास्त होणे, मायक्रोट्यूब लॅटरलमधून निघून जाणे, त्यांना पीळ बसणे यामुळे पाण्याचे समसमान वाटप होत नाही, त्यामुळे शक्‍यतोवर मायक्रोट्यूब वापरणे टाळावे.

ठिबक सिंचन संचाची निगा :
ठिबक सिंचनाचे तंत्र वापरणे अत्यंत सोपे आहे; मात्र त्यासाठी संचाचे भाग, त्याचा वापर व निगा याबाबतीतील किमान माहिती घेणे आवश्‍यक आहे. ठिबक स ंचाची योग्य निगा व देखभाल न झाल्यास त्याची कार्यक्षमता कमी होऊ शकते. पावसाळ्यानंतर किंवा ताण संपल्यानंतर संच सुरू करताना योग्य काळजी न घेतल्यास ठिबक तोट्या, लॅटरल बंद पडतात व पाणी प्रवाह बंद होतो. त्याचप्रमाणे खताच्या टाकीस छिद्रे पडणे, गाळ – कचरा साचणे अशा प्रकारचे प्रश्‍न नि र्माण होतात. अशा वेळी संच बंद करताना किंवा सुरू करताना काही काळजी घेणे आवश्‍यक आहे.

संच सुरू करताना घ्यावयाची काळजी :
1) संचासाठी वापरण्यात येणाऱ्या विद्युत मोटारीची सर्व जोडणी तपासून पाहावी. मोटारीच्या वाइंडिंगला वॉर्निश देऊन दोन-चार दिवस उन्हात ठेवावी.
2) पंप व फूट व्हॉल्व स्वच्छ करून पंपास ग्रीसिंग करावे.
3) सिंगल फेज प्रोटेक्‍टर (एक फेज कार्य करीत नसल्यास विद्युतपुरवठा आपोआप खंडित करणारे उपकरण) बसविले असल्यास त्याची कार्यतत्परता तपासून पाहावी.
4) संचातील सर्व व्हॉल्व, प्रेशरगेज (दाबमापक), पाणीमापक (वॉटर मीटर) तपासून योग्य पद्धतीने कार्य करतात, याची खात्री करावी.
5) मुख्य पाइप, उपमुख्य पाइप, टेकअप, लॅटरल इ. भागांतील सर्]
]>

Comments are closed.