Uncategorized

महाराष्ट्र्रात


महाराष्ट्र्र राज्य उष्ण कटीबंधात मोडते. त्यामुळे राज्यातील हवामान बहुतांशी समशितोष्ण व कोरडे आहे. राज्यात सर्वसाधारण पणे पावसाचे प्रमाण ५०० ते ६०० मि. मी. पर्यंत आहे व वार्षिक सरासरी ७५० मि. मी. आहे. मुख्यत: पाऊस नैऋत्य मान्सुन वार्‍यापासून ६० ते ७० दिवसात पडतो. शिवाय महाराष्ट्र्रातील पुर्व भागात ईशान्य मान्सुन वार्‍यापासून सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडतो. उन्हाळयात तपमान जास्तीत जास्त ४३ अंश सेल्सियस पर्यंत वाढते. तर हिवाळयात ते ८ अंश पर्यंत वाढते. तर हिवाळयात ते ८ अंश पर्यंत उतरते.
महाराष्ट्र्रातील पश्चिम किनारपट्टीवर हवामान उष्ण व दमट असते, तर मध्य महाराष्ट्र्रात ते कोरडे व पुर्व भागात उष्ण व पावसाळी असते. हवेतील आद्रतेचे प्रमाण ५० टक्क्यापर्यंत असून, उन्हाळयात ते ३० टक्क्यापर्यंत राहते.

हवामान विभाग :

पाऊसमान, जमिनी , पीकपद्धती, वनस्पती आणि उष्णतामान या सर्वांचा विचार करून महाराष्ट्र्राचे खालील प्रमाणे ९ कृषी हवामान विभाग पाडले आहेत.

दक्षिण कोकण किनार विभाग

या विभागात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हयांचा समावेश होतो. पावसाचे सरासरी प्रमाण ३१०० मि. मि. आहे. भात आणि नागली ही प्रमुख पिके घेतली जातात. या भागातील जमीन जांभाषांतरांवरूनया दगडापासून तयार झाली आहे.

उत्तर कोकण किनार विभाग :-

या विभागात ठाणे आणि रायगड जिल्हयांचा समावेश होतो. पावसाचे सरासरी प्रमाण २६०० मि.मि. आहे. भात हे प्रमुख पीक असून, नागली, व वरई ही महत्वाची पिके आहेत.

पश्चिम घाट विभाग :-

हा भाग म्हणजे सहयाद्री पर्वताच्या डोंगर माथ्यावरील दक्षिणोत्तर चिंचोळा पट्टा असून, या विभागात २.१० लाख हेक्टर क्षेत्र मोडते. हा विभाग सर्वसाधारण पणे समुद्रसपाटीपासून १००० ते १९०० मीटर उंचीवर आहे. पाऊसाचे वार्षिक सरासरी प्रमाण ५००० मि.मि. आहे. या विभागाचा २२ ते २५ टक्के प्रदेश जंगलांनी व्यापलेला आहे. भात, नागली, सावा कोद्रा ही पिके घेतली जातात.

उपपर्वतीय विभाग :-

हा विभाग सहयाद्रीच्या पुर्वेकडच्या उताराचा आहे. हा विभाग नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापुर व सांगली या जिल्हयातील पश्चिमेकडील १९ तालुक्यात विस्तारलेला असून त्याचे क्षेत्रफळ १०,२८९ चौ. कि. मि. आहे.
या विभागातील वार्षिक पावसाची सरासरी १७०० ते २५०० मि. मि. आहे. या विभागातील सरासरी कमाल तपमान २८ ते ३५ अंश सेल्सियस तर सरासरी तापमान १४ ते १९ अंश सेल्सियसच्या दरम्यान असते.
भात, नागली ज्वारी, बाजरी, भुईमुग इत्यादी खरीप पिके तसेच रबी ज्वारी गहु, हरभरा, वाल इत्यादी रबी पिके, तसेच ऊस ही पिके घेतली जातात. त्याचप्रमाणे भाजीपाला पिकाखाली ३२.९ हजार हेक्टर क्षेत्र असून, त्यामध्ये बटाटा, कांदा, मिरची, टोमॅटो, वांगी ही भाजीपाला पिके घेतली जातात.

पश्चिम महाराष्ट्र्र मैदानी प्रदेश :-

या विभागात धुळे व सांगली जिल्हयाचे पश्चिमेकडील तालुके आणि नाशिक, पुणे, सातारा व कोल्हापुर जिल्हयातील मधले तालुके समाविष्ट आहेत. या विभागाचे क्षेत्रफळ १७.९१ लाख हेक्टर एवढे आहे.
या विभागातील पावसाचे प्रमाण सरासरी ९५० ते १२५० मि.मि. एवढे असून, तो समप्रमाणात विखुरलेला असतो, या विभागात सरासरी कमाल तापमान ४० अंश सेल्सियस एप्रिल व मे महिन्यात किमान तापमान ५ अंश सेल्सियसच्या दरम्यान डिंसेबर महिन्यात असते.
हा विभाग प्रामुख्याने खरीपाचा असून, त्यात ज्वारी, बाजरी, भुइमुग, मुग, उडीद, तूर ही खरीप पिके रबी खरीप पिके घेतली जातात. तसेच गहू, हरभरा, ज्वारी ही रबी पिके घेतली जातात. ऊसाचे पीक मोठया प्रमाणात घेतले जाते. या विभागातील बरेच क्षेत्र भाजीपाला व फळझाडांच्या लागवडीखाली आहे.

पश्चिम महाराष्ट्र्र कमी पावसाचा विभाग :-

या विभागात संपुर्ण सोलापुर, अहमदनगर, जिल्हा आणि सातारा, सांगली, पुणे, धुळे, जळगाव, नाशिक, बुलढाणा, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आणि लातुर जिल्हयांच्या काही भागाचा समावेश होतो. विभागाचे एकुण क्षेत्रफळ ७३.२३ लाख हेक्टर आहे. या विभागात पावसाचे प्रमाण ७५० मि.मि. पेक्षा कमी असून, त्याचे वितरण असमान आहे.
याविभागात पाऊस जुन / जुलै महिन्यात व दुसर्‍यांदा सप्टेंबर महिन्यात अधिक प्रमाणात पडतो. या विभागात खंडाचा कालावधी २ ते १० आठवडे ही कधी कधी असतो, अधिक तापमान व उष्ण वारे आढळून येतात व बाष्पीभवनाचा वार्षिक दर १८०० मि.मि. एवढा आहे.
या विभागात सरासरी कमाल तापमान एप्रिल व मे मध्ये ४१ अंश सेल्सियस व सरासरी किमान तापमान डिंसेबरमध्ये १४ ते १५ अंश सेल्सियसच्या दरम्यान असते.
या विभागातील ७० ते ७५ टक्के क्षेत्र रबी पिकांखाली असून, भारी जमिनीत ज्वारी, करडई , हरभरा ही रबी पिके प्रामुख्याने घेतली जातात. हलक्या जमिनीत खरीपात २५ ते ३० टक्के क्षेत्रावर बाजरी, सुर्यफुल, भुईमुग, तुर, ज्वारी इत्यादी पिके घेतली जातात. तसेच बाजरी+तूर २:१ व सुर्यफुल+तूर २:१ ही आंतरपिक पद्धती आर्थिकदृष्टया फायदेशिर व शाश्वत असल्याने या पद्धतीचा अवलंबही केला जातो.

मध्य महाराष्ट्र्र पठारी विभाग :-

या विभागात पावसाचे प्रमाण ७५० ते ९५० मि.मि. आहे. ७५ टक्क्यापेक्षा जास्त पाऊस खरीपात पडत असल्यामुळे ज्वारी, कापुस, भुईमुग, सुर्यफुल, उडीद, मुग इ. खरीप पिके घेतली जातात. बागायती खाली ज्वारी, गहु आणि कापुस उन्हाळी भुईमुग या पीक पद्धतीचा अवलंब आढळतो.

मध्य विदर्भ विभाग :-

या विभागात पावसाचे प्रमाण ९५० ते १२५० मि.मि. आहे. जमिनी काळया रंगाच्या व भारी आहेत. कापुस, भुईमुग, सुर्यफुल, उन्हाळी भुईमुग या पीक पद्धतीचा अवलंब आढळतो.

पुर्व विदर्भ विभाग :-

या विभागात भंडारा आणि गडचिरोली जिल्हे आणि चंद्रपुर जिल्हयाचा पुर्वेकडील भाग, नागपुरमधील उमरखेड तालूका यांचा समावेश होतो. पावसाचे प्रमाण १२५० ते १७०० मि.मि. आहे. जमिनीचा रंग पिवळसर तपकिरी ते तांबूस आहे. भात हे खरीपातील महत्वाचे पीक आहे. तर ज्वारी, हरभरा, जवस, गहू ही पिके रबी हंगामात येतात.

Type in Marathi (Press Ctrl+g to toggle b etween English and Marathi)

वरील माहिती वाढविण्यासाठी व अद्ययावत(Update)ठेवण्यासाठी मदत करा :

17  +   16   =        


Comment


No records

Comments are closed.